खारघर येथील मुरबी गावामध्ये बेकायदा बांधकाम तोडण्याचे काम सिडको प्रशासनाच्या वतीने सुरु असताना शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या कामाला विरोध केल्यामुळे पोलीसांनी शेकापचे सरचिटणीस बाळाराम पाटील यांना ताब्यात घेतले.बाळाराम पाटील यांना ताब्यात घेतल्यामुळे  कार्यकर्ते संतप्त झाले होते.  काही तासांमध्ये पोलीसांनी बाळाराम पाटील यांची सुटका केली. प्रकल्पग्रस्त व्यवासायीक वापरासाठी ही बांधकामे वापरत असल्यास ती नक्की तोडावी असेही पाटील म्हणाले. सिडको आता प्रकल्पग्रस्तांवर कायद्याचा बडघा चालवत असल्याचे सांगून यापुढचा हातोडा सिडको वसाहतीच्या बैठय़ा वसाहतींमधील अनियंत्रित बांधकांमावर करणार असल्याचे पाटील यांनी रहिवाशांना सांगीतले. त्यामुळे या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्तांसह रहिवाशांची एकत्रित ताकद दिसण्याची शक्यता आहे.