िहदी आणि उर्दू गजल जी आधी दिवाणखान्यापुरती आणि अभिजनांपर्यंतच मर्यादित होती, तिला सर्वसामान्य रसिकांपर्यंत नेण्याचे श्रेय जगजित सिंह यांना जाते. मराठीमध्ये हे आव्हान त्याहून कठीण होते, तरीही भाऊसाहेब पाटणकर, सुरेश भट या शायरांनी व त्यानंतर भीमराव पांचाळे यांच्यासारख्या गजलगायकाने ही कामगिरी करून दाखविली. गजलकार आणि गजलप्रेमी यांच्यातील एक्स्प्रेस मार्ग म्हणजे भीमराव असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरणार नाही, एवढय़ा निष्ठेने त्यांनी गजलगायनाला व गजलच्या प्रसाराला वाहून घेतलं आहे. दस्तुरखुद्द सुरेश भट यांनी भीमरावांचा गौरव गजलनवाज असा केला, यातच सारं काही आलं.

भीमरावांच्या अनोख्या गायकीने रसिकांचं काळीज केव्हाच जिंकलं आहे. या रसिकांना त्यांच्या नवनवीन रचनांची नेहमीच प्रतीक्षा असते. त्यामुळे तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर आलेल्या त्यांच्या ‘श्वास गजल’ या नव्या ध्वनिफितीचे चाहत्यांनी मनापासून स्वागत केलं आहे. युनिव्हर्सल म्युझिक इं.ची निर्मिती असलेल्या या संचात सात गजलांचा नजराणा असून त्यांचं गायन व संगीत अर्थातच भीमराव यांचं आहे. भीमरावांच्या गायकीचा बहर आजही ओसरलेला नाही, याची साक्ष यात मिळते. या अल्बमची सुरुवात होते ती ‘श्वास गजल निश्वास गजल, जगण्याचा विश्वास गजल..’ या सुनील तांबे यांच्या रचनेने. प्रामुख्याने यमन आणि काहीशा हंसध्वनीच्या सुरावटीने जाणारी ही गजल पहिल्या श्रवणातच मनात कायमची नोंदली जाते. गजलची महती सांगताना तांबे यांनी लिहिलेला ‘द्वेषाची दुनिया बदले, माणुसकीचा ध्यास गजल..’ हा शेर खास दाद देण्याजोगा. संगीता जोशी यांची ‘दान द्यावे लागते..’ ही गजलही अप्रतिम. यातील हा शेर पहा. गजल ही शब्दसुरांची पालखी, त्यात दु:खाला कुस्करावे लागते, दान द्यावे लागते, जीवनाला दान द्यावे लागते! मधुसूदन नानिवडेकर यांनी रचलेल्या ‘भलभलते सांगतेस’ या गजलला सुरांमध्ये गुंफताना भीमरावांनी गजल आणि नाटय़संगीताचं फ्यूजन असा आगळावेगळा प्रयोग केला आहे आणि त्यासाठी एकताल वापरण्याची कल्पकता दाखविली आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

भीमराव नेहमीच उत्तमोत्तम गजला निवडत असल्याने यातही त्यांनी सुरेश भटांची एक गजल घेतली आहे, ती म्हणजे ‘आता असे करुया नाही म्हणावयाला, प्राणात चंद्र ठेऊ, हाती उन्हे धरुया..’

यातील आर्तता ठळक करण्यासाठी चारुकेशी रागाचा घेतलेला आधार दाद देण्यासारखा तसेच यातील व्हायोलिनचे तुकडेही लाजबाब. ‘हा जसा आला तसा जाळून गेला’ ही प्रमोद खराडे यांची गजलही श्रवणीय झाली आहे, तर ‘टाळलेस तू मागे बघणे वळता वळता, ती नजरेची भेट राहिली घडता घडता..’ हे वीरेंद्र बेडसे यांच्या शब्दांनाही भीमरावांनी लीलया स्वरबद्ध केलं आहे. रोशनीचे कायदे पाळायचे, रात्र आली की दिवे जाळायचे.. या बदीउज्जम खावर यांच्या गजलने या अल्बमची सांगता होते. या अखेरच्या रचनेसाठी भीमरावांनी भरवीची केलेली कल्पक निवड परिपूर्णतेचं समाधान देते. यमनपासून सुरू झालेली ही मफल भरवीला येऊन थांबेपर्यंत भीमरावांच्या गायकीचं एक सुंदर कोलाज मनात तयार झालेलं असतं!

 सैंय्या दिल में आना रे.. 

िहदुस्थानी चित्रपटसृष्टीचं शतक नुकतंच पूर्ण झालं. दादासाहेब फाळके यांनी रोवलेल्या त्या बीजाचा आता केवढा मोठा कल्पतरू झाला आहे, हे वेगळं सांगायला नको. आपल्या चित्रपटसृष्टीचं ठळक वैशिष्टय़ कोणतं असेल तर ते म्हणजे त्यातील गाणी. त्याशिवाय आपले चित्रपट पूर्ण होऊ शकत नाहीत, तर ही चित्रपटसृष्टी जेव्हा कात टाकत होती, संगीताचे बाज बदलत होते, त्या कालखंडावर आपल्या गायकीची मोहोर उमटवलेली एक गायिका म्हणजे शमशाद बेगम! लता मंगेशकर नावाच्या आख्यायिकेने चित्रपटसृष्टीला झपाटण्यापूर्वी शमशाद बेगम यांच्या खणखणीत स्वराने रसिकांना वेड लावलं होतं. या ज्येष्ठ गायिकेचं महिनाभरापूर्वी वयाच्या चौऱ्याण्णाव्या वर्षी निधन झालं. तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेमारू एंटरटेन्मेंट लि. या कंपनीने ‘श्रद्धांजली- शमशाद बेगम’ या डीव्हीडीची निर्मिती केली आहे.

दोन तासांच्या या डीव्हीडीमध्ये शमशाद बेगम यांनी गायलेली तब्बल पस्तीस गाणी पाहण्यास मिळतात. वैजयंतीमालाच्या ‘बहार’ या पदार्पणाच्या चित्रपटातील ‘सैंय्या दिल में आना रे, आके फिर ना जाना रे..’ या गाण्याने या अल्बमची सुरुवात होते. (सचिनदेव बर्मन यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा हे गाणं खूप वेगळं आहे.) याशिवाय शमशाद यांचं नाव घेतल्यानंतर लगेच आठवतात त्या ‘मेरे पिया गए रंगून’ (पतंगा), ‘डर ना मोहब्बत कर ले’ (अंदाज), ‘एक दो तीन’ (आवारा), ‘ओ जानेवाले आजा तडपानेवाले’ (तकदीर), ‘तेरी मफिल में किस्मत आजमाकर’ (मोगल-ए-आझम) या गाण्यांचाही यात समावेश आहे. मात्र ओ. पी. नय्यर यांना ज्या गाण्याने हात दिला त्या ‘कभी आर कभी पार’ या गाण्याचा तसेच शमशाद यांना अनेक वर्षांनंतर ओपींनी ज्या गाण्यासाठी पाचारण केलं त्या ‘कजरा मोहब्बतवाला’ (आशा भोसले यांच्यासह) या गाण्यांचा यात समावेश नाही. तरीही हा अल्बम रसिकांचा नॉस्टेल्जिया जागा करते यात शंका नाही.

१९५०च्या दशकाच्या मध्यापर्यंतचा काळ या गायिकेने गाजविला. सी. रामचंद्र, नौशाद, सचिनदेव बर्मन, ओ. पी. नय्यर यांची ती प्रमुख गायिका होती, मात्र लतायुग अवतरल्यानंतर शमशाद बेगम काहीशा बाजूला पडल्या. लता या संगीतकारांची पहिली पसंतीच नव्हे तर प्रेरणाही ठरली. (अपवाद ओपींचा) दोन गायिकांची तुलना करणे अप्रस्तुत, तरीही संगीताच्या व चित्रपटांच्या बदलत्या प्रवाहात शमशाद यांचा आवाज कालबाह्य़ ठरला (आठवा, ‘नया अंदाज’मधील ‘मेरे िनदो में तुम’ हे शमशाद यांचं किशोरकुमारसोबतचं युगुलगीत) व लताचा गोड, लवचीक स्वर बाजी मारून गेला, हे सत्य आहे. अर्थात प्रसिद्धीच्या वलयापासून दूर गेल्यानंतरही शमशाद यांनी या बदलत्या परिस्थितीविषयी वा कोणत्याही संगीतकाराविषयी कधीही तक्रारीचा सूर काढला नाही, हे विशेष. यासाठी फार मोठं काळीज असावं लागतं.

असो, या महान गायिकेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेमारूने काढलेला हा अल्बम एक प्रकारे िहदी चित्रपटगीतांच्या इतिहासाचे दस्तावेजीकरणच आहे, यात शंका नाही.

      -अनिरुद्ध भातखंडे

      ंल्ल्र१४िँं.ुँं३‘ँंल्लीि@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे