30 May 2020

News Flash

शिंदी-नीरा लागवडीसाठी व्यापक चळवळ

ग्रामीण आणि आदिवासी भागात कमी प्रतीच्या जमिनीत रुजणारे िशदीचे झाड म्हणजे बहुपयोगी कल्पवृक्षच आहे. या भागातील गरिबी, कुपोषण तसेच रोजगाराच्या प्रश्नांवर पायाभूत स्वरूपाचे काम करण्यासाठी

| February 20, 2014 02:45 am

 ग्रामीण आणि आदिवासी भागात कमी प्रतीच्या जमिनीत रुजणारे िशदीचे झाड म्हणजे बहुपयोगी कल्पवृक्षच आहे. या भागातील गरिबी, कुपोषण तसेच रोजगाराच्या प्रश्नांवर पायाभूत स्वरूपाचे काम करण्यासाठी नगर जिल्हय़ात पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागात शिंदी लागवडीची चळवळ राबविणार असल्याची घोषणा उद्योजक व कृषितज्ज्ञ सुनील कानवडे यांनी केली.
स्नेहालयच्या हिंमतग्राम प्रकल्पातील एचआयव्ही-एड्सबाधित परिवार तसेच देहव्यापारातून मुक्त होऊन नवजीवनाकडे वाटचाल करू इच्छिणा-या महिलांच्या पुनर्वसनासाठी  िशदी-नीरा लागवड प्रकल्पाचे मंगळवारी उद्घाटन झाले. या वेळी कानवडे बोलत होते. लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीचे सरव्यवस्थापक अरिवद पारगावकर, उद्योजकांच्या आमी संघटनेचे अध्यक्ष अशोक सोनवणे, माळीनगर येथील नीरा संशोधक निळकंठ भोंगळे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. नारकर (ठाणे), स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी, संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
हिंमतग्राम प्रकल्पात स्नेहालयने ५ एकर जागेवर नीरा उत्पादन करणा-या खजूर िशदीच्या १ हजार ५०० झाडांची लागवड केली आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने या उपक्रमासाठी विशेष सहयोग दिला. तसेच नगर औद्योगिक वसाहतीमधील सिद्धी स्टॅम्पिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयएनआय फार्मस या उद्योगांनी तांत्रिक व आर्थिक साहाय्य दिले आहे.   
हिंमतग्राम हा स्नेहालयचा मागील १२ वर्षांत विकसित झालेला एक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव प्रकल्प आहे. नगरमधील हेमचंद तथा बाबूशेठ भंडारी आणि चंपालालजी चोपडा यांनी आपल्या माता-पित्यांच्या स्मरणार्थ ईसळक येथे दिलेल्या १० एकर जागेच्या देणगीतून हा प्रकल्प सुरू झाला. सध्या एकूण २८ एकर जागेवर हा प्रकल्प विस्तारला आहे. येथे सध्या दुग्ध प्रकल्प, पॉली हाऊसमधील भाजी उत्पादन व अन्य कृषी आधारित रोजगारक्षम प्रकल्प विकसित होत आहेत. लवकरच १०० परिवारांसाठी निवासी वसाहत उभारण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. लोकसहभागातूनच उभ्या राहणा-या िहमतग्राम प्रकल्पात देशाच्या सर्व भागांतून येणा-या लाभार्थीना सहभागी करून घेतले आहे. स्नेहालयला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी नगरमधील उद्योजक आणि शेतकरी असणा-या कानवडे यांनी स्वखर्चाने व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन िशदी लागवड आणि नीरा उत्पादनाचा प्रयोग राबविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2014 2:45 am

Web Title: broad movement for the cultivation of shindi neera
Next Stories
1 टोलमाफीची खोटी घोषणा करणा-या मंत्र्यांनी मालमत्ता विकून भरपाई करावी
2 शशिकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी
3 लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी गृहमंत्र्यांची शिफारस
Just Now!
X