भारतीय दूरंसंचार निगमच्या (बीएसएनएल) वतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दूरध्वनी व तरंग सेवा ग्राहकांच्या मोफत कॉल्समध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांच्या मासिक शुल्कात ११० वरून १२०अशी वाढ करण्यात आली आहे.
एक जुलैपासून बीएसएनएलच्या लँडलाइन आणि तरंग सेवेच्या फोनवरून बीएसएनएल व इतर फोन कंपन्यांना केल्या जाणाऱ्या कॉल्सच्या कालावधीतही सुधारणा करण्यात आलेली आहे. लँडलाईन व तरंग सेवेच्या फोनवरून ग्रामीण, शहरी विभागातील ग्राहकांनी बीएसएनएल लँडलाईन मोबाईलवर केलेल्या मोफत कॉल्सची संख्याही वाढविण्यात आली आहे. ब्रॉडबँड सेवेच्या रात्रीच्या सेवेतही सुधारणा करण्यात आली आहे. ब्रॉडबँडच्या ‘फ्री नाईट’ योजनेचे नामकरण’ कन्सेशनल नाईट टॅरिफ’ असे करण्यात आले असल्याची माहिती महाप्रबंधक सुरेशबाबु प्रजापति यांनी दिली.