गेले ६० दिवस प्राध्यापक संघटनेचा परीक्षा कामकाजावरील बहिष्कार चालू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकांची समाजात प्रतिष्ठा खालावत चालली आहे. त्यांच्या विरोधात संयुक्त विद्यार्थी संघटना संघर्ष समितीने गुरुवारी शिवाजी चौकात सुटाच्या मागणीपत्रकाची होळी केली. प्राध्यापकांच्या अरेरावी भूमिकेविरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.    
प्राध्यापकांच्या संपामुळे महाराष्ट्रातील २० लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आहे. तरीही प्राध्यापक संघटना संप मागे घेण्यासाठी तयारी दाखवत नाहीत. यामुळे शिवाजी विद्यापीठ विभागातील सर्व विद्यार्थी संघटना मतभेद विसरून एकत्र आले आहे. त्यांनी आज रस्त्यावर येऊन प्राध्यापक संघटनेचा निषेध नोंदवला. त्यांच्या मागणी पत्रकाची होळी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानेही शिक्षकांना जाग येत नसेल तर सर्व विद्यार्थी संघटना प्राध्यापकांविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा संयुक्त संघटना संघर्ष समितीने दिला आहे.