औसा-तुळजापूर मार्गावरील शिंदाळा येथे मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव बसने मालमोटारीला मागच्या बाजूने ठोकरले. या अपघातात बसमधील ३४ प्रवासी जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला.
नांदेडहून सोलापूरकडे जाणारी बस (एमएच १४ टी २५१६) मालमोटारीला (एमएच २६ ६१२०) मागे टाकून पुढे जात असताना बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बसची मालमोटारीला मागून धडक दिली. या अपघातात पूनम संतोष केदारे (वय ४, सोलापूर) व संतोष केदारे गंभीर जखमी झाले. शांताबाई पलमारे (सोलापूर), गंगाधर पांचाळ, पंढरीनाथ पवार (घुंगराळ), गोविंद पांचाळ (आशीव), अशोक चव्हारे (गुळखेडा), नागनाथ परमारे, विद्यानंद बडी (सोलापूर) कैलास शिंदे, परमेश्वर कुरे, शिवाजी पांचाळ (नायगाव), अरुण कांबळे (बेळीखुर्द) हणमंत शिंदे (मोहदळ), कांतिलाल दुर्गे (नांदेड), अमोल देकडे (सोलापूर), पांडुरंग कल्याणकर (पार्डी), मिलिंद बातल (अटकूळ), मिर्झा बेग (नांदेड), भारत निकम (कोल्हापूर), गोविंद ऊसगुले (नळदुर्ग), उस्मा झुबेर, शकील बेगम, बाबूराव शिंदे, लक्ष्मीकांत अदवेलकर (नांदेड), डि. आर. जाधव (मांडवी), एकानाथ मुळे हिंगणगाव, अशोक गंधले चिखली, भास्कर मोरे (नांदेड), रमाकांत खंदाडे नळेगाव, सुधाकर सरोदे वाई, सौदागर नन्नावरे (सोलापूर), उत्तप्पा लव्हासी (कर्नाटक) आदी प्रवाशांचा जखमीत समावेश असून, उपचारासाठी त्यांना औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालमोटारचालक माधव भिवाजी कराड (तिरुका, तालुका जळकोट) याच्या फिर्यादीवरून नांदेड-सोलापूरच्या बसचालकाविरोधात भादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.