News Flash

एका घरावर एक घर मोफत

‘लोकसत्ता वास्तुलाभ’ उपक्रमांतर्गत ‘एका घरावर एक घर मोफत’ मिळवण्याची संधी वाचकांना मिळत आहे. विविध गृहनिर्माण समूहांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून पहिल्या तीन

| March 26, 2014 09:19 am

‘लोकसत्ता वास्तुलाभ’ला पहिल्या तीन दिवसांत उदंड प्रतिसाद
‘लोकसत्ता वास्तुलाभ’ उपक्रमांतर्गत ‘एका घरावर एक घर मोफत’ मिळवण्याची संधी वाचकांना मिळत आहे. विविध गृहनिर्माण समूहांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून पहिल्या तीन दिवसांत हजारो लोकांनी त्यास उदंड प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमात एका घरावर एक घर मिळवण्यासाठी २२ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत उपक्रमात सहभागी असलेल्या गृहनिर्माण समूहांच्या प्रकल्पांमध्ये नवीन घराचे बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यावेळी बिल्डरकडून एक फॉर्म देण्यात येतो. यानंतर तुम्ही घराची नोंदणी करून ती कागदपत्रे आणि बिल्डरकडून मिळालेला फॉर्म संपूर्ण भरून १५ मेपर्यंत संबंधित बिल्डरांकडे सादर करायचा आहे. यातून भाग्यवान विजेत्यांना घर, आंतरराष्ट्रीय सहली यासारखी बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. हा उपक्रम ‘तुलसी इस्टेट’ने प्रस्तुत केला असून ‘केसरी’ सहप्रयोजक आहे. तर जे. के. इलेक्ट्रिॉनिक्स यांचे बक्षिसांसाठी प्रायोजकत्व आहे. या स्पध्रेला नियम व अटी लागू राहतील.
या उपक्रमात सहभागी असलेल्या बिल्डरांची यादी खालीलप्रमाणे
तुलसी इस्टेट, राज ग्रुप- तुलसी सिटी, मोहन ग्रुप, टाटर फ्लोरेन्स, नीलसिद्धी ग्रुप, चाम्र्स ग्रुप, संघवी ग्रुप, क्वॉलकॉन रियल्टी एलएलपी, ऋतु ग्रुप ऑफ कंपनीज, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स लि., कर्नाळा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस प्रा. लि., रोझा ग्रुप, हाय टेक इन्फ्रा., भावे बिल्डर्स, डेझी गार्डन, आर अ‍ॅण्ड सी (वसंत व्हॅली), रिद्धि-सिद्धि ग्रुप, वर्धमान ग्रुप, सुदर्शन निर्माण ग्रुप, श्री गणेश असोसिएट, अरविंद व्हिक्टोरी बिल्डर, मोरया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., श्री महावीर पटवा बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, विरेन इन्फ्रा वेंचर्स प्रा. लि., प्रख्यात इनिशिएटिव्ह (यलो ट्री), कार्तिक
डेव्हलपर्स, अद्वितीय मार्केटिंग, अ‍ॅडव्हान्टेज होम्स्,
साई सृष्टी एंटरप्रायझेस, गुरुकृपा ग्रुप, रौनक ग्रुप,
फाइव्ह पी ग्रुप, निखिल कन्स्ट्रक्शन्स, पोद्दार हाऊसिंग, लाभ ग्रुप.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2014 9:19 am

Web Title: buy one home get one free
टॅग : Loksatta
Next Stories
1 २ एप्रिलला शाळांमध्ये आणीबाणी!
2 दुर्दैवाचे दशावतार संपता संपेनात!
3 मुंबईकरांची परवड सुरूच!
Just Now!
X