22 September 2020

News Flash

इगतपुरीत आज निवडणूक आयुक्तांचे शिबीर

राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन् यांसह इतर बारा राज्यांतील निवडणूक आयुक्त बुधवारी येथे आयोजित निवडणूकविषयक शिबिरास उपस्थित राहणार आहेत. मानस रिसॉर्ट येथे हे शिबीर होणार आहे.

| December 19, 2012 02:34 am

राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन् यांसह इतर बारा राज्यांतील निवडणूक आयुक्त बुधवारी येथे आयोजित निवडणूकविषयक शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
मानस रिसॉर्ट येथे हे शिबीर होणार आहे. या शिबिरात नीला सत्यनारायणन् या इतर राज्यांतील निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती अभियानाबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तहसीलदार गोविंद शिंदे यांनी दिली. सत्यनारायणन् या घोटीतील साधना वाचनालयाच्या वतीने आयोजित महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षण शिबिरालाही मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील मतदानाची कार्यप्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र, याविषयी शिबिरात चर्चा होणार आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 2:34 am

Web Title: camp by election commissioner in igatpuri
टॅग Election
Next Stories
1 ग्रामविकास अधिकाऱ्यांऐवजी ग्रामसेवकांकडे कारभार
2 जळगाव जिल्हा गृहरक्षक समादेशक निवडीचा वाद
3 ‘नागपूर आंदोलनात नाशिकचे वारकरीही सहभागी होणार’
Just Now!
X