20 September 2020

News Flash

जामठय़ात कर्करोग रुग्णालयाचे भूमिपूजन

सेवाभावी वृत्तीने रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित असल्यामुळे समाजामध्ये कर्करुग्णांची वाढती संख्या बघता उपराजधानीत

| March 3, 2015 07:07 am

सेवाभावी वृत्तीने रुग्णांना सेवा देणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित असल्यामुळे समाजामध्ये कर्करुग्णांची वाढती संख्या बघता उपराजधानीत मध्यवर्ती ठिकाणी कर्करोग रुग्णालयांची गरज होती. सर्व सुविधायुक्त तयार होणाऱ्या या रुग्णालयाचा गरिबांना फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जामठामध्ये साडेचौदा एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. आबाजी थत्ते संशोधन संचालित राष्ट्रीय कर्करोग रुग्णालयाच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अजय संचेती, डॉ. आनंद पाठक, ललित टाकचंदाणी, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, गिरीश गांधी, शैलेश जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या रुग्णालयांची संख्या कमी आहे. कर्करोगावर उपचार करताना मोठय़ा प्रमाणात येणारा खर्च सामान्य रुग्णांना परवडणारा नाही. गेल्या अनेक वर्षांंपासूनचे स्वप्न आज दृष्टीक्षेपात येत असल्याचा आनंद आहे. यासाठी राज्य शासन मदत आणि सहकार्य करण्यास तयार आहे. सर्वाच्या सोयीची जागा आम्ही शोधत होतो. डॉ. पाठक यांनी यासाठी केलेले सहकार्य कोणीही विसरू शकणार नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना राहता यावे यासाठी धर्मशाळा बांधण्यात येईल. त्यासाठी संस्थेने नफातोटय़ाचा विचार न करता सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भैय्याजी जोशी म्हणाले, कर्करुग्णालयाची गरज आहे हे सत्य असले तरी हा आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या दिशेने संस्थेने काम करण्याची आवश्यकता आहे. अजय संचेती यांनी रुग्णालयाची माहिती देताना सांगितले, रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यत्रसामुग्रीसह ३५० खाटा राहणार आहेत. सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सहा शस्त्रक्रिया कक्ष निर्माण केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या परिसरात नर्सिग ट्रेनिंग स्कूल, डॉक्टरांची राहण्याची सोय अशा सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन शैलेश जोगेळेकर यांनी केले. आनंद औरंगाबादकर यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 7:07 am

Web Title: cancer hospital in jamatha
टॅग Nagpur
Next Stories
1 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ‘त्रिसूत्री’ कार्यक्रम राबवा
2 नागपूर, वणीत लवकरच राष्ट्रीय संस्थेसह तीन मोठे उद्योग
3 मूलभूत गरजांसाठी आर्थिक तरतूद, कर सवलती मिळाव्यात
Just Now!
X