News Flash

युवतीचे अपहरण, दहा आरोपींविरुद्ध गुन्हा

लग्न करण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील एका युवतीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याप्रकरणी दहा आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

| July 24, 2013 10:23 am

लग्न करण्याच्या उद्देशाने मध्य प्रदेशातील एका युवतीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याप्रकरणी दहा आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणा मार्गावरील गजानन नगरात राहणाऱ्या जमालखान व अस्लमखान या दोघांनी मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्य़ातल्या महूगंज येथून १० जुलैला मध्यरात्री एका २१ वर्षांच्या महिलेचे अपहरण केले. तिला मोटारसायकलने नागपुरातील घरी आणले. जमालखानच्या घरी तिला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. जमालचे वडील नसीम रज्जाक खान व पत्नी पूजा खान यांनी तिला जमालशी लग्न करण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ तसेच मारहाण केली. ती ऐकत नाही हे पाहून २० जुलैपासून रेहान मुजावर मोहम्मद मुजावर (रा. वासुदेवनगर), राजेश लखन मिश्रा (रा. गजानननगर), विक्की, कासीम गुलाब खालीद (रा. गजानननगर) व त्यांच्या दोन साथीदारांनी जमालसोबत लग्न न केल्यास अश्लील शिवीगाळ करीत तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली. तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले व तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंदवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 10:23 am

Web Title: case failed against 10 of abduction of a young women
Next Stories
1 ‘वेगळ्या वाटा’ मुक्तसंवाद साधणारा कार्यक्रम
2 .. तरीही सहकार खात्याचा रिकाम्या पोटावर आसूड ओढणारा फतवा
3 बुलढाण्यासह जिल्ह्य़ातील ३ तालुक्यांना पावसाने झोडपले
Just Now!
X