30 November 2020

News Flash

अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्या निर्मात्यास अटक

चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देत एका अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्या चित्रपट निर्मात्यास चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. मफरूल गडियाल असे या आरोपीचे नाव आहे.

| January 10, 2015 06:46 am

चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देत एका अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्या चित्रपट निर्मात्यास चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. मफरूल गडियाल असे या आरोपीचे नाव आहे.
२१ वर्षीय पीडित अभिनेत्री गोरेगाव येथे राहते. तिचे तीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. डिसेंबर महिन्यात तिची ओळख गडियालशी झाली होती. मी चित्रपट निर्माता आणि इव्हेंट मॅनेजर असल्याचे त्याने या अभिनेत्रीला सांगितले होते. ‘सेव्हंटी हावर’ आणि ‘आयडेंटिटी कार्ड’ हे माझे दोन आगामी चित्रपट असून त्यापैकी एका चित्रपटात काम देण्याचे आश्वासन त्याने या अभिनेत्रीला दिले. चित्रपटाची कथा ऐकण्यासाठी त्याने तिला चारकोप येथील आपल्या घरी बोलावले. तेथे करारनामा झाल्याचे सांगत तिला धनादेश दिला आणि पार्टी दिली. मद्यपान केल्यानंतर ही अभिनेत्री बेशुद्ध झाली होती. त्याचा फायदा घेत गडियालने तिच्यावर बलात्कार केला. मात्र मी तुझ्याशी लग्न करेन, असे आश्वासन दिल्यानंतर ती गप्प राहिली होती. यानंतरही वेगवेगळ्या हॉटेल आणि लॉजेसमध्ये नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.
या काळात त्याने या अभिनेत्रीला दिलेला धनादेश काढून घेतला तसेच चित्रपटात कामही दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपास करून घडियाल याला फसवणूक तसेच बलात्काराच्या गुन्ह्य़ात अटक केली. घडियाल याने यापूर्वी अभिनेता सुनील शेट्टी यालाही फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:46 am

Web Title: cast couch in mumbai
टॅग Bollywood
Next Stories
1 ८० लाख रुपयांचे एमडी जप्त
2 हे प्रभू तुम्ही पुन्हा पुन्हा या..
3 घरची धुणी धुवायची कोणी?
Just Now!
X