डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्यापासून (रविवार) २० नोव्हेंबर दरम्यान विद्यापीठाच्या नाटय़गृहात होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांची उपस्थिती व अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे आहेत. महोत्सवात सहा रंगमंचांवर एकूण ३५ कलाप्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत. १०० महाविद्यालयांच्या प्रवेशिका स्पर्धेत आल्या असून सुमारे दीड हजार कलावंत सहभागी होणार आहेत. समारोपप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांनी दिली.