02 December 2020

News Flash

ठाण्यात सोनसाखळी, कारटेप चोरांचा सुळसुळाट

ठाणे शहरात मागील २४ तासात सोनसाखळी आणि कारटेप चोरीच्या तब्बल नऊ घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

| January 10, 2015 07:34 am

ठाणे शहरात मागील २४ तासात सोनसाखळी आणि कारटेप चोरीच्या तब्बल नऊ घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून सोनसाखळी चोरांनी अक्षरश धुमाकूळ घातला असून वारंवार मोहिमा राबवूनही या प्रकारांना अटकाव घालण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. असे असताना गुरुवारी दिवसभरात ठाण्यातील वेगवेगळ्या भागात कारच्या काचा फोडून आतील ऐवज लंपास करण्याचे प्रकारही घडले.
सोनसाखळी चोरांना अटकाव घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी मध्यंतरी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबविले होते. या चोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनाही रस्त्यावर उतरून या मोहीमेत सहभागी व्हावे लागले होते. या मोहिमेनंतर सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये घट झाली होती. तसेच अशा चोरांच्या काही टोळ्याही पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. गेल्या महिन्यात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने सोनसाखळी चोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे १५० गुन्हे उघडकीस आणले होते. सोनसाखळी चोरांची ठाणे पोलिसांमार्फत कारवाई सुरू असली तरी, सोनसाखळी चोरीचे प्रकार अजूनही घडत आहेत. ठाणे शहरातील कळवा, नौपाडा, कासारवडवली आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून नेल्याच्या चार घटना घडल्या असून मोटारसायकलवरून वेगाने येऊन थेट गळ्याला हात घालण्याचे प्रकार पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. सोनसाखळीपाठोपाठ आता कारटेप चोरांच्या टोळ्या शहरात सक्रिय झाले असून या टोळ्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून कारटेप चोरून नेतात. याशिवाय कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप तसेच महत्त्वाची कागदपत्रे चोरटे चोरून नेतात. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने शहरातील कारचालक हैराण झाले आहेत. शहरातील वर्तकनगर, वागळे इस्टेट, नौपाडा या तीन पोलीस ठाण्यांमध्ये गुरुवारी पाच कारटेप चोरीच्या गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 7:34 am

Web Title: chain snatching incidents increased in thane
टॅग Thane
Next Stories
1 ‘आरटीओ’च्या तपासणीने रिक्षा चालकांची पळापळ
2 वाढीव वीज देयकांमुळे ग्राहक हैराण
3 कल्याण, डोंबिवलीला वाढीव पाणी
Just Now!
X