16 January 2021

News Flash

चंद्रशेखर वाघ फाऊंडेशनचा १९ जुलै रोजी शुभारंभ सोहळा

सांज लोकसत्ताचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर वाघ यांच्यास्मृतिनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या ‘चंद्रशेखर वाघ फाऊंडेशन’चा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी पत्रकारीताक्षेत्रात मोलाचे योगदान

| July 12, 2013 09:41 am

सांज लोकसत्ताचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर वाघ यांच्यास्मृतिनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या ‘चंद्रशेखर वाघ फाऊंडेशन’चा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला असून यावेळी पत्रकारीताक्षेत्रात मोलाचे योगदान असलेल्या ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र हसमनीस यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच सामाजिक क्षेत्रासाठीचा पुरस्कार ‘सर्वहारा जन आंदोलन’ या संस्थेला देण्यात येणार आहे. शुक्रवार १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता गडकरी रंगायतन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पत्रकारिता क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देणे, गरजू पत्रकारांना अर्थिक सहाय्य करणे यासारखे विविध उपक्रम चंद्रशेखर वाघ फाऊंडेशन तर्फे राबविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2013 9:41 am

Web Title: chandrashekhar vagh foundation opening
टॅग Marathi News,News
Next Stories
1 अंबरनाथमध्ये डुकरांचा हैदोस;नागरिक त्रस्त, प्रशासन हतबल
2 मनसेकडून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
3 भाज्यांचे भाव खाणे बंद होणार शहरांलगतची लागवड अधिक किफायतशीर
Just Now!
X