News Flash

कल्याणमधील मतदान केंद्रांमध्ये बदल

कल्याणमधील वाडेघर, चिकणघर, आधारवाडी, जोशीबाग, टिळक चौक, शिशुविहार विकास शाळा येथील जुनी मतदान केंद्रे नवीन शाळा, महाविद्यालये, सभागृहांमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत.

| October 14, 2014 06:31 am

कल्याणमधील वाडेघर, चिकणघर, आधारवाडी, जोशीबाग, टिळक चौक, शिशुविहार विकास शाळा येथील जुनी मतदान केंद्रे नवीन शाळा, महाविद्यालये, सभागृहांमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. कल्याण पश्चिम विभागाचे निवडणूक अधिकारी अशोक मुंढे यांनी हे फेरबदल जाहीर केले आहेत.
वाडेघर येथील जुनी मतदान केंद्र वायले नगरमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये व मोहिंदरसिंग काबूलसिंग हायस्कूल मध्ये, चिकणघर येथील काही मतदान केंद्रे बिर्ला महाविद्यालयात, आधारवाडी येथील मतदान केंद्र श्री कॉम्प्लेक्समधील डॉन बॉस्को शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत. शिशू विकास शाळा, मल्हारनगर येथील केंद्र गजानन विद्या प्रसारक मंडळाच्या शिशू विहार विकास शाळेत, टिळक चौकातील केंद्र गायन समाज इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 6:31 am

Web Title: changes in polling centers of kalyan
टॅग : Election,Kalyan
Next Stories
1 कल्याणला विकासासाठी दिलेल्या निधीची चौकशी करणार – पृथ्वीराज चव्हाण
2 प्रचार हायटेक.. उमेदवार मात्र जुनाटच
3 M मतदार इंडिकेटर – भिवंडी पूर्व : दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ..
Just Now!
X