04 July 2020

News Flash

मराठवाडय़ातील यंगस्टार मार्केटिंगवर उमरखेडमध्ये फसवणुकीचा गुन्हा

‘लकी ड्रॉ‘ योजना चालविणाऱ्या मराठवाडय़ातील यंगस्टार मार्केटिंग व सेल्स प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळ, अधिकारी व संयोजकांवर न्यायालयाच्या आदेशावरून उमरखेड ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

| January 18, 2013 04:38 am

‘लकी ड्रॉ‘ योजना चालविणाऱ्या मराठवाडय़ातील यंगस्टार मार्केटिंग व सेल्स प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळ, अधिकारी व संयोजकांवर  न्यायालयाच्या आदेशावरून उमरखेड ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा कंपनी एजंटच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आल्याने ग्राहकात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडय़ातील अर्धापूर येथे मुख्य कार्यालय व तालुक्यातील ढाणकी येथे विभागीय कार्यालय असलेल्या यंगस्टार मार्केटिंग व सेल्स प्रमोशन प्रा.लि.तर्फे लकी ड्रॉ योजना राबवून ग्राहकांना वस्तू देण्यात येतात. या कंपनीचे तालुक्यात व परिसरात असंख्य ग्राहक आहेत.
या कंपनीचा कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या प्रशांत भानेगावकर यांनी ग्राहक तयार करून दिल्यानंतर व त्यांच्यामार्फत तयार झालेल्या ग्राहकांना ‘ड्रॉद्वारे बक्षीस लागल्यानंतरही कंपनीने बक्षीस दिले नाही. यामुळे प्रशांत भानेगावकर यांनी उमरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयात धाव घेऊन कंपनीमार्फत अनेकांची फसवणूक होत असल्याने त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात याचिका दाखल केली.
यानंतर न्यायालयाने १५६(३) कलमान्वये यंगस्टार मार्केटिंग व सेल्स प्रमोशन प्रा.लि. सर्व संचालक, पार्टनर  तसेच अधिकारी व डॉ. अनिल हरीष नगराळे (ढाणकी) व विजय गोिवदराव विणकरे (रा.बिटरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यावरून पोलिसांनी या साऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुरळे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2013 4:38 am

Web Title: cheating crime on youngstar marketing
टॅग Cheating
Next Stories
1 गीतगायन स्पर्धेत बारापात्रे तर वक्तृत्व स्पर्धेत गोस्वामी प्रथम
2 ‘मुख्य प्रवाहात या अन्यथा पोलीसही लढाईस तयार’
3 ‘मनोवेध’ करणार विविध क्षेत्रातील सेवाव्रतींचा सत्कार
Just Now!
X