जिल्हा परिषदेतील सौर पथदिव्यांच्या कामात झालेल्या आíथक गैरव्यवहाराची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तसेच चौकशी प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करून दोषींविरुद्ध  फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, असेही निर्देश खंडपीठाने दिल्याची माहिती जि. प. सदस्य विजयसिंह पंडित यांनी दिली.    
जिल्हा वार्षकि योजनेंतर्गत सौर पथदिवे बसविण्याच्या कामात दीड कोटीच्या गरव्यवहारप्रकरणी पंडित यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत व चौकशी सहा महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयाने या प्रकरणात फौजदारी स्वरूपातील गुन्हा मान्य केला असून, चौकशीनंतर दोषींविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.