परभणी शहर महापालिकेच्या वतीने दारिद्रय़रेषेखालील महिलांना, तसेच रमाई घरकुल योजनेचे धनादेश वाटप महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
दारिद्रय़रेषेखालील महिलांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम महिलादिनानिमित्त आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी तिरुमला खिल्लारे, तर प्रमुख पाहुण्या म्हणून अंबिका डहाळे, रेखा कानडे, सचिन कांबळे, अनिल समिंद्रे आदी उपस्थित होते. मनपाच्या वतीने २१ महिला बचतगटांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कुटीर उद्योगातील मालासाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारण्यास जागा देण्याचे आश्वासन महापौर देशमुख यांनी दिले. शहराच्या रमाबाईनगर, संजय गांधीनगर, भीमगनर, क्रांतीनगर, आंबेडकरनगर, वर्मानगर परिसरातील घरकुल योजनेसाठी १२० पात्र लाभार्थ्यांना २४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप महापौरांनी केले. सूत्रसंचालन सुशील कांबळे यांनी केले.