विदर्भाच्या विकासाला गती देणाऱ्या ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’चा आढावा घेण्यासाठी उद्योग खात्याचे प्रधान सचिव येत्या ५ एप्रिलला  घेणार आहे. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अ‍ॅडव्हान्टेज विदर्भासाठी स्थापन करम्यात आलेल्या स्थानिक स्तरावरील समितीची गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. विभागीय आयुक्त बी. गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच व्हीआयएचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’वर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. गेल्या २५ आणि २६ फेब्रुवारीला झालेल्या दोन दिवसांच्या औद्योगिक गुंतवणूक परिषदेवर किती कोटीचे सामंजस्य करार झाले, शासनस्तरावर अनेक आश्वासने देण्यात आली, या आश्वासनांची पूर्ती करून त्यांना कशा प्रकारे गती देता येईल, यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. यात अनेक बडय़ा टाटा सन्सचे सर्वेसर्वा सायरस मिस्त्रींसह अनेक बडय़ा उद्योगपतींनी हजेरी लावली. १४ हजार कोटींचे कोटींचे सामंजस्य करार ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’मध्ये झाले होते. शसनाने या कार्यक्रमासाठी १० कोटी रुपये दिले होते. एकंदर वस्तुस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी उद्योग खात्याचे प्रधान सचिव ५ एप्रिलला नागपुरात येणार आहेत. या कार्यक्रमावर किती खर्च झाला, काय अडचणी आल्या, त्या दूर करून पुढील वर्षी  कशा प्रकारे कार्यक्रम घेता येईल याचा आढावा यावेळी घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.