News Flash

शिक्षण हक्क कायद्याद्वारे मुलांना जबाबदार नागरिक बनवा- ढोबळे

शिक्षण हक्क कायद्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण देऊन देशाचा जबाबदार

| January 27, 2013 09:02 am

शिक्षण हक्क कायद्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण देऊन देशाचा जबाबदार नागरिक बनविण्याचे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ६३ व्या वर्धापनदिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून नागरिकांना शुभेच्छा देताना शिक्षणाद्वारे मुलांना जबाबदार नागरिक बनविण्याचे आवाहन केले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, सोलापूर महापालिकेचे आयुक्त अजय सावरीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शानदार संचलन झाले. यावेळी पालकमंत्र्यांना सलामी देण्यात आली. संचलनात शहर पोलीस, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०, वाहतूक शाखेसह राष्ट्रीय छात्र सेना, सैनिक स्कूल व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. परेड कमांडर म्हणून सोलापूर ग्रामीण विभागातील परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रीती टिपरे यांनी जबाबदारी सांभाळली.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल तर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र (आयएसओ मानांकन) मिळाल्याबद्दल कार्यालयाचे अधीक्षक बाळासाहेब वानखेडे तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने अहल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रीती श्रीराम, सविता व्होरा (अकलूज), माजी उपमहापौर सुमन मुदलियार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अपर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ध्वजारोहण केले. महापालिकेत महापौर अलका राठोड तर जिल्हा परिषदेत अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडल कार्यालयात मंडल व्यवस्थापक के. प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2013 9:02 am

Web Title: children become a responsible citizen by educational right law dhoble
Next Stories
1 कोल्हापुरात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
2 बेळगावनजीक नदीपात्रात तेरा मृत अर्भके सापडली
3 चुकीच्या उपचारांमुळे बाळ दृष्टिहीन झाल्याने डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल
Just Now!
X