‘नासा’चे शास्त्रज्ञ बेदव्रत पेन दिग्दर्शित ‘चितगाँग’ हा ब्रिटिशांच्या विरोधातील संघर्षांच्या सत्य घटनेवर आधाारित हिंदी चित्रपट असून त्याचा विशेष खेळ प्रभात चित्र मंडळातर्फेनरिमन पॉईण्टच्या चव्हाण सेंटरमध्ये सोमवार, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता दाखविण्यात येणार आहे.
या विशेष खेळासाठी दिग्दर्शक बेदव्रत पेन आणि चित्रपटातील प्रमुख कलावंत उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात चितगाँग या खेडय़ात राहणाऱ्या झुंकू रॉय व त्याच्या मित्रांनी शिक्षकाच्या मदतीने ब्रिटिशांविरोधात केलेल्या सशस्त्र उठावाचे चित्तथरारक चित्रण या चित्रपटात आहे. मनोज बाजपेयी, नवाझुद्दिन सिद्दिकी, दिलजाद हिवाले, राजकुमार यादव, जयदीप अहलावत आदींच्या या प्रमुख भूमिकेत आहेत. झुंकू रॉय ही प्रमुख व्यक्तिरेखा दिलजाद हिवाले या कलावंताने केली आहे. अधिक माहितीसाठी ३ ते ७ या वेळेत २४१३१९१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.