ऐरोली सेक्टर २ येथील दत्ता मेघे महाविद्यालयासमोरील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्याखालील वसलेल्या झोपडय़ांवर अखेर मंगळवारी धडक कारवाई केली. यामध्ये ६० हुन अधिक झोपडय़ा जमिनदोस्त करत दहा हजार चौमीटर चा भूखंड सिडकोने अतिक्रमण मुक्त केला आहे.  
ऐरोली मध्ये उच्च दबाच्या विद्युत वाहिन्याखालील मोकळया भूखंडावर अनाधिकृतपणे झोपडय़ा बांधून त्या गरजुना विकण्याचा नवा धंदा भुमाफियांनी सुरु केला होता. ५० ते ८० हजारापर्यत या झोपडया विकल्या जात होत्या. सिडकोच्या जागेवर वसलेल्या आणि उच्च दबाच्या विद्युत वाहिन्याखाली वसलेल्या या झोपडयामुळे तिथून ये जा करणाया सर्वसामन्य नागरिकांना देखाल नाहक त्रास करावा लागत होता. सिडकोने व नवी मुंबईमहानगरपालिकेच्या सयुक्त मोहिमेत या झोपडय़ा हटविण्यात आल्या. यावेळी सिडकोचे अतिक्रमण आधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस उपस्थित होते.
यांसदर्भात सिडकोचे अतिक्रमण आधिकारी डी.डी.गनावरे यांनी सदरचा भुखंड उद्यानासाठी राखीव असून यावर अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपम्डय़ा  हटवल्याचे सांगत हा  या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी माहिती फलक लावण्यात येणार असल्याचे सांगितले.