News Flash

लिंबूवर्गीय फळ उत्पादकांचा राष्ट्रीय मेळावा ३० व ३१ ऑक्टोबरला

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ३० व ३१ ऑक्टोबरला लिंबूवर्गीय फळ उत्पादकांचा राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

| October 16, 2014 01:23 am

राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ३० व ३१ ऑक्टोबरला  लिंबूवर्गीय फळ उत्पादकांचा राष्ट्रीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हे केंद्र दर्जेदार फळ उत्पादनाकरिता तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करीत असून हे काम शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. लिंबूवर्गीय फळांवर विदर्भाकरिता तंत्रज्ञान अभियानातर्फे संत्री, मोसंबी, लिंबू उत्पादकांचा राष्ट्रीय पातळीवरील  मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशातील ७-८ राज्यांतील हजारावर शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहतील.
या मेळाव्यादरम्यान लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ‘लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात संत्री, मोसंबी, लिंबू आणि इतर लिंबूवर्गीय फळांच्या नमुन्यांना तसेच बचतगटाद्वारे केलेल्या लिंबूवर्गीय प्रक्रिया उत्पादकांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे रोख रूपात पारितोषिके देण्यात येईल. लिंबूवर्गीय फळ उत्पादकांनी आणि प्रक्रियेच्या संबंधित स्वयंरोजगार असणाऱ्यांनी फळाचे कमीतकमी १०-१२ नुमने राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रात ३० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेपर्यंत आणावेत, अशी विनंती करण्यात येत आहे. आपली नोंदणी डॉ. आशुतोष मुरकुटे (९८६००९९२१४१), डॉ. आय.पी. सिंग (९४०३९२९१४५), डॉ. एम.आर. चौधरी (९४१३२०४९८५) व पी.डी. कोरडे (९४२२३३३५२५) यांच्याकडे करावी. शेतक ऱ्यांनी या मेळाव्यात भाग घेऊन नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी केली आहे. वेगवगळ्या विषयावरील तज्ज्ञ स्लाईड शो च्या माध्यमाने नवीन तंत्रज्ञानाची माहिती देतील, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:23 am

Web Title: citrus fruit producers national gathering on october 30 and 31
Next Stories
1 विदर्भात १०३८ उमेदवारांचे भाग्य आज मतदान यंत्रात बंद
2 मतदानासाठी जय्यत तयारी
3 नागपूर ग्रामीणमध्ये चर्चा
Just Now!
X