महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ अभियान’ राबविण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले. ३१ ऑक्टोबपर्यंत ही मोहीम सर्वत्र राबविण्यात येत असून शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकही पुढे सरसावले आहेत.
महावीर अभियांत्रिकी
महावीर एज्युकेशन सोसायटी संचालित महावीर अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वच्छता मोहिमेत प्राचार्य, प्राध्यापक आणि मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तंत्रशिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची जबाबदारी महावीर महाविद्यालयाने घेतली असताना शिक्षणाबरोबर चांगल्या गुणांची जोपासना करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आल्याची प्रतिक्रिया प्राचार्य मनोज बुरड यांनी व्यक्त केली.
बिटको महाविद्यालय
महात्मा गांधी जयंती व लालबहादूर जयंतीनिमित्त वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मुख्याध्यापिका रेखा काळे यांनी सर्वाना स्वच्छतेची शपथ दिली. मुलींना स्वच्छ भारत अभियानाची माहिती दिली. उपमुख्याध्यापिका अनुराधा अमृतकर, पर्यवेक्षक रायजादे बाळकृष्ण, संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिलच्या सदस्या वासंती पेठे व नेहा मुळे यांनीही मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी या वेळी शाळेचा परिसर स्वच्छ केला. या वेळी अरुण महाजन, सुभाष महाजन, अमित भट आदी उपस्थित होते.
सिन्नर येथील ब. ना. सारडा विद्यालय व आरंभ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीदिनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी प्रत्येक वर्गाची, मैदानाची स्वच्छता केली. नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालय ते लाल चौक, शिवाजी चौक या भागांतील रस्ते झाडले. स्वत:च्या हाताने तयार केलेले घोषवाक्य फलकाद्वारे व प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कृतीद्वारे समाजाला संदेश दिला. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन स्वच्छता कर्मचारी दिलीप शेख यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. गाव स्वच्छ करणारे पालिका कर्मचारी दिलीप शेख, राजू आडगावकर, दीपेश वैद्य आदींचा शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशपांडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. देशपांडे यांनी मनोगतातून स्वच्छतेचे महत्त्व मांडले. मुख्याध्यापक प्र. ला. ठोके यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली. पर्यवेक्षक गो. न. मंगाळे, माधवी पंडित यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
मानस व्यसनमुक्ती केंद्र
महात्मा गांधी जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक मिडटाऊन, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी नारायण नर्सिग महाविद्यालय यांच्या वतीने अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मानस व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्ती संदेश यात्रा हुतात्मा स्मारकापासून काढण्यात आली. युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन भगत यांनी केले. व्यसनमुक्ती संदेश यात्रेचे उद्घाटन भगत, अवतारसिंग फनफेर पोलीस निरीक्षक इंगळे, डॉ. राम गोसावी यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्तविक डॉ. चंद्रशेखर नामपूरकर यांनी केले. समारोपप्रसंगी राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, स्वामी नारायण नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांना चेतन देवरे यांनी राष्ट्रीय स्वच्छता अभियानाविषयी प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमात मानस व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांनी पथनाटय़ सादर केले.
सावंत महाविद्यालय
नाशिक येथील जी. डी. सावंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता शपथ घेण्यात आली. डॉ. यू. बी. पवार यांनी प्रास्ताविकात शपथचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी सर्वानी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालयातील परिसर, कार्यालयातील स्वच्छता, स्वच्छतेविषयी जाणीव जागृती तसेच महाविद्यालयाने दत्तक घेतलेले राजूर बहुला या गावातील ग्रामस्थांसोबत स्वच्छता आणि वृक्षारोपण या कार्यक्रमांचा आढावा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. शेंडगे यांनी घेतला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. ए. डी. बांदल, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी टी. वाय. पठाण, उपप्राचार्य प्रा. के. व्ही. शेंडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभागप्रमुख प्रा. एम. व्ही. देशपांडे आदी उपस्थित होते.
वावरे महाविद्यालय
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ व जिमखाना विभाग यांच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. पी. एस. पवार यांनी गांधीजींचे तत्त्वज्ञान, सर्वधर्मसमभाव, स्वयंशिस्त, मानसिक शुद्धता याविषयी माहिती दिली. प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी स्वच्छतेचा संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य प्रा. एन. एम. शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना विशद केली. स्वच्छ भारत अभियानाची शपथ घेण्यात आली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. एस. टी. घुले यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. के. एम. खालकर यांनी आभार मानले.
साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नाशिक येथील श्रीसाईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट आणि रिसर्च सेंटर यांच्या वतीने केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ या अभियानांतर्गत कालिदास कलामंदिरासमोरील रस्ता स्वच्छ करण्यात आला. कलामंदिर ते अण्णा भाऊ साठे चौक या दरम्यानचे दुभाजक स्वच्छ करण्यात आले. या वेळी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. पल्लवी धर्माधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ‘माझे नाशिक निरोगी नाशिक’ अशी घोषणा दिली.

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा