24 September 2020

News Flash

सहारा चाइल्ड सेंटरतर्फे दीडशे मुलांना कपडेवाटप

शहरातील रेल्वे स्टेशन भागात सहारा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरने दत्तक घेतलेल्या दीडशे गरीब मुलामुलींना आमदार एम. एम. शेख यांच्या हस्ते कपडे व बुटांचे वाटप करण्यात आले.

| February 6, 2013 01:50 am

शहरातील रेल्वे स्टेशन भागात सहारा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरने दत्तक घेतलेल्या दीडशे गरीब मुलामुलींना आमदार एम. एम. शेख यांच्या हस्ते कपडे व बुटांचे वाटप करण्यात आले. शहरातील दीडशे गरीब व गरजवंत मुलामुलींना संस्थेने सर्वागीण विकासासाठी दत्तक घेतले असून, या प्रत्येक मुलामुलीच्या कुटुंबाचा याद्वारे विकास साध्य करण्याचा हेतू यामागे असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुनील शेजूळ यांनी या वेळी सांगितले. आमदार शेख यांनी या वेळी या सेंटरचे उद्घाटन करताना संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. पर्यटन विभागाचे आय. आर. व्ही. राव, नगरसेविका आशाताई मोरे, काँग्रेसचे नेते चंद्रभान पारखे, प्रा. रहेमान, प्रा. आर. बी. गायकवाड, विनोद वैरागर, जॉन व ऊर्मिला डोंगरदिवे, समन्वयक विकास डोंगरदिवे, विश्वास वैरागर, विशाल घुले, प्रवीण त्रिभुवन, निवृत्त मेजर शिवाजी भोगले, रमेश आव्हाड या वेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2013 1:50 am

Web Title: cloth destribution to 150 children by sahara child centre
Next Stories
1 चव्हाण यांच्या दौऱ्यात ‘मिलके चलो’चा नारा!
2 सत्तेतील बदमाशांना धडा शिकविणार- मुंडे
3 आपत्कालीन पाणीपुरवठय़ासाठी महापालिकेची यंत्रणा सरसावली
Just Now!
X