03 March 2021

News Flash

जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा – मुख्यमंत्री

नागपूर जिल्ह्य़ातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली ३१३ गावे पाणी टंचाईमुक्त व्हावी यासाठी नियोजनबद्ध काम करावे

| March 17, 2015 07:10 am

नागपूर जिल्ह्य़ातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली ३१३ गावे पाणी टंचाईमुक्त व्हावी यासाठी नियोजनबद्ध काम करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेताना केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. या बैठकीस विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे उपस्थित होते. जिल्ह्य़ात ४० टक्के भाग बेसाल्ट खडकाचा आहे. यात काटोल, नरखेड, हिंगणा व नागपूर तालुक्याचा समावेश होतो. येथे भूजल पुनर्भरण प्रमाण अल्प आहे. काटोल व नरखेड तालुक्यात १३५ गावे अंशत: शोषित आहेत. मागील ५ वर्षांच्या तुलनेत ऑक्टोबर २०१४ मध्ये पाण्याच्या पातळीत जिल्ह्य़ातील ७ तालुक्यात सरासरी ० ते १ मीटर घट तर इतर ६ तालुक्यात ० ते १ मीटर वाढ झाली आहे. महसूल, जलसंधारण, वन, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, जिल्हा परिषद या विविध विभागातील वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक गाव दत्तक देण्यात आले आहे, अशी माहिती सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी बैठकीत दिली.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-म्युटेशन ही योजना नागपूर जिल्ह्य़ात राबविण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील ४९६ तलाठय़ांना लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनर देण्यात आले आहे. ऑनलाईन म्युटेशन सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक तालुका व उपअधीक्षक कार्यालयात म्युटेशन सेल्स स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील महसूल, भूमीअभिलेख, नोंदणी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना औरंगाबाद व तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले, असेही या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीस जिल्ह्य़ातील सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 7:10 am

Web Title: cm in nagpur 2
Next Stories
1 नवप्रवर्तन ही यशाची किल्ली – गडकरी
2 मेडिकल-सुपर-मेयो रुग्णालयाला १३ कोटी मिळणार
3 मोकाट डुकरांमुळे स्वाइन फ्लूचे थमान
Just Now!
X