उत्तराखंडमध्ये देवभूमीत झालेला जलप्रपात, नरेंद्र दाभोलकर हत्याकांड, दिल्लीतील निर्भया बलात्कार ही यंदाच्या कवठेएकंद येथील शोभेच्या दारूकामाची यात्रेकरूंची आकर्षणे ठरली. स्फोटाची दुर्घटना झाल्यानंतर अवघ्या चार तासाने शोभेच्या दारूकामाने आकाश उजळून टाकणारी सप्तरंगी आतषबाजी डोळे दीपवणारी ठरली. कारुण्याची झालर असतानाही ग्रामदैवताच्या श्रद्धेपोटी सोमवारी रात्री झालेली आतषबाजी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
रात्री ९ वाजता बिऱ्हाडसिद्ध महाराजांची पालखी बसस्थानकानजिक उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर याच ठिकाणी बिरोबाची पालखी भेटीसाठी आली. मानकरी सुधाकर पाटील यांच्या हस्ते शिलंगणाच्या सोन्याचे पूजन झाल्यानंतर प्रथेप्रमाणे सोने लुटण्यात आले. त्यानंतर रावणाच्या पुतळ्याचे दहन होताच औटाची सलामी मंदिर परिसरातील मोकळ्या मदानात सुरू झाली. गावातील शंभरहून अधिक दारूशोभा मंडळांनी आपापली आऊट या ठिकाणी उडविण्यास सुरुवात केली. आकाशात एक कि.मी. उंचीपर्यंत हे आऊट जावून रंगबिरंगी रंगांची उधळण करीत होते. काही श्रद्धाळू भाविकांनी नवसापोटी बोललेले आऊटही या ठिकाणी उडविण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत आऊट उडविण्याचे काम सुरू होते.
या दरम्यान पालखी मार्गस्थ करण्यात आली. पालखीपुढे विविध दारू शोभा मंडळांनी वेश, लाकडी िशगट, तोटय़ांची कमान, फुगडी, मोर, झाडे, मक्ऊयुरी आदी दारू कामाचे प्रदर्शन केले. चालू वर्षी ए-वन मित्र मंडळाने सादर केलेली देवभूमीवरील केदारिलग येथे झालेल्या जलप्रपाताची दारूकामातून आतषबाजी प्रदर्शित केली, तर आकारामबापू घाईल युवा मंचच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हल्ल्याचा देखावा सादर करणारे दारूकाम प्रदíशत केले. तोडकरबंधू मंडळाने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना झालेल्या फाशीच्या घटनेचे दारूकामातून चित्रण सादर केले.
मिरवणूक मार्गावर शंभरहून अधिक दारूशोभा मंडळांनी लाकडी शिंगटे, जमिनीत पुरलेली होती. जसजशी पालखी पुढे येईल तसतशी ही शिंगटे पेटविण्यात येत होती. शिंगटातील दारूकाम ५०-५० फूट उंचीचे आणि ५ ते ७ मिनिटे चालणारे प्रदíशत करण्यात येत होते. याचवेळी कागदीशिंगट, पत्रीबाण, झाडे, १०० ते १२५ टय़ूबलाईटचा प्रकाश निर्माण होईल इतक्या क्षमतेची मक्र्युरी दारूकाम प्रदर्शित करण्यात येत होते.
मराठा समाज मंडळाच्या वतीने मंदिरासमोर प्रथमोपचाराची सोय उपलब्ध करून ठेवली होती. यात्रेकरूंना ध्वनिक्षेपकावरून घ्यावयाच्या खबरदारीचे सातत्याने आवाहन या ठिकाणी करण्यात येत होते. आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्ण सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी मंडळाच्या वतीने या ठिकाणी रुग्णवाहिकाही उपलब्ध ठेवण्यात आली होती. तसेच तासगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दल तनात करण्यात आले होते. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त  तनात करण्यात आला होता.