तरुणाईच्या जगण्यातील सुसंवादावर भाष्य करणारा विषय ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटातून विनोदी अंगाने रसिकांना भिडणार आहे. प्रकाश कुंटे आणि राहुल ओदक यांच्या ‘मोशन स्केप एण्टरटेन्मेंट’ची निर्मिती असलेल्या प्रकाश कुंटे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे, दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, भूषण प्रधान, अविनाश नारकर, संदेश कुलकर्णी, अनुजा साठे यांच्या भूमिका आहेत. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या गीतांना आदित्य बेडेकर यांनी संगीत दिले आहे.
आपल्या जगण्यामध्ये नात्यांचे महत्त्व आहे. ही नाती आयुष्यभर जपण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. आधीच्या पिढय़ांमध्ये असलेला मायेचा ओलावा आजच्या नात्यांमध्ये कुठे तरी हरवला आहे. ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधण्याकडे कल असलेली सध्याची पिढी जोडीदाराबरोबर संवाद साधून नात्यांची रेशीमगाठ घट्ट बांधण्याचा प्रयत्न करते. अशाच पिढीवर हा चित्रपट भाष्य करतो, असे राहुल ओदक यांनी सांगितले.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Gangu Ramsay
व्यक्तिवेध: गंगू रामसे