महाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित येथील रचना विद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला कृतीयुक्त प्रतिसाद देण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक शपथ घेऊन स्वच्छता अभियान राबविले.
मुख्याध्यापिका सुचेता येवला, उपमुख्याध्यापिका संगीता टाकळकर, पर्यवेक्षक सुनील गायकवाड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन केले. वंदना पवार व सायली महाजन यांनी मार्गदर्शन केले. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणारा कुंभमेळा पर्यावरणपूरक कसा करता येईल याविषयी रचना इको क्लब प्रमुख नीलेश ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत आणि हरितकुंभाची शपथ दिली.