ज्या प्राध्यापकांना विद्यापीठ परीक्षा केंद्रावर सहकेंद्राधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे ती नियुक्ती सक्तीची करण्याचा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू झाल्यापासून विद्यापीठ परीक्षांची कामे करण्यास प्राध्यापक मोठय़ा प्रमाणात टाळाटाळ करतात, असा विद्यापीठाचा अनुभव आहे. त्यामुळे परीक्षांची कामे खोळंबून रहायची म्हणून नियुक्ती सक्तीची करण्याचा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला आहे. काही प्राचार्य विद्यापीठ परीक्षा केंद्रावर सहकेंद्राधिकारी म्हणून पाठवण्यास इच्छूक नसायचे. काही ठिकाणी प्राध्यापक व प्राचार्य यांच्यात टाळाटाळ करण्या बाबत मिलीभगत असायची. सहकेंद्राधिकारी म्हणून नियुक्ती देतांना संबंधित प्राघ्यापकांना सात वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीप्रमाणे विद्यापीठ परीक्षांची कामे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आलेली आहेत. विद्यापीठ परीक्षांची कामे करण्यास नकार देणाऱ्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरुघ्द शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद देखील आहे, पण  विद्यापीठ परीक्षांची कामे करण्यास प्राध्यापक मोठय़ा प्रमाणात टाळाटाळ करतात, असा विद्यापीठाचा अनुभव आहे म्हणून ज्या प्राध्यापकांना विद्यापीठ परीक्षा केंद्रावर सहकेंद्राधिकारी म्हणून नियुक्ती दिली आहे ती नियुक्ती सक्तीची करण्याचा निर्णय संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. सहकेंद्राधिकारी म्हणून नियुक्ती दिलेल्या प्राध्यापकांना तुमची नियुक्ती सक्तीची आहे, असे नियुक्ती पत्रातच प्रभारी परीक्षा नियंत्रकांनी कळवले आहे.