News Flash

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कम्पॅनियनशिप कार्निव्हल’

डिग्निटी फाऊण्डेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कम्पॅनियनशिप कार्निव्हल’चे आयोजन शनिवार, १ जून रोजी करण्यात आले आहे. एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहचर मिळावा, साथीदाराचा शोध घेता यावा

| May 31, 2013 12:24 pm

डिग्निटी फाऊण्डेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कम्पॅनियनशिप कार्निव्हल’चे आयोजन शनिवार, १ जून रोजी करण्यात आले आहे. एकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सहचर मिळावा, साथीदाराचा शोध घेता यावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध स्पर्धा, खेळ यांनी कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. दुपारी १२ वाजता लिव्ह-इन पार्टनरशिपटचा वाढता कल या विषयावरू वादविवाद होणार आहे. यात रेणुका शहाणे, सिद्धार्थ काक, डॉली ठाकोर आदी सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये फलदायी वृद्धापकाळ या विषयावर खास कार्यशाळा होणार आहे. त्यामध्ये सुधा मेनन यांचे लिखाण आणि प्रकाशन यावरील कार्यशाळा, सौंदर्य विषयावर जमुना पै यांचे मार्गदर्शन, फोटोग्राफी अ‍ॅज लाईफ या विषयावर आयेशा ब्रोचा यांची कार्यशाळा असे अनेक कार्यक्रम आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा फॅशन शोही संध्याकाळी होणार आहे. कॅण्डल लाईट डिनरने या कार्यक्रमाची सांगता होईल. हा दिवसभराचा कार्यक्रम तेजपाल हॉल, ऑगस्ट क्रांती मैदान, गावदेवी येथे होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:24 pm

Web Title: companionship carnival for senior citizens
टॅग : Senior Citizens
Next Stories
1 ‘झलक दिखला जा’चे नवे पर्व शनिवारपासून
2 जुन्या गाण्यांचा गंध नव्या रूपात
3 ‘पोलीसगिरी’च्या ट्रेलरचे उद्घाटन
Just Now!
X