26 September 2020

News Flash

सहाय्यक नगर रचनाकारांविरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

अंबरनाथ पालिकेचे सहाय्यक नगररचनाकार कार्यालयात न येता परस्पर बाहेरूनच बांधकाम परवानग्या देत असल्याचा आरोप नियोजन सभापती संदीप लकडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला असून कारवाई

| June 27, 2013 04:51 am

अंबरनाथ पालिकेचे सहाय्यक नगररचनाकार कार्यालयात न येता परस्पर बाहेरूनच बांधकाम परवानग्या देत असल्याचा आरोप नियोजन सभापती संदीप लकडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केला असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सहाय्यक नगररचनाकार दिनेश नेरकर यांनी आपण कोणतेही नियमबाह्य़ काम केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
संदीप लकडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी नगर रचना सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून (२९ मे) सहाय्यक नगररचनाकार कार्यालयात आलेले नाहीत. हजेरी बुकातही त्यांची नोंद नाही. तरीही ते बांधकाम आराखडय़ांना परवानग्या देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी दिलेल्या परवानग्यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  दिनेश नेरकर यांनी मात्र आपण कोणतेही गैर काम केलेले नाही. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांस हजेरी बुकात नोंद करणे बंधनकारक नसते. कामाचा दैनंदिन अहवाल मात्र मुख्याधिकाऱ्यांना देतो, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी सहाय्यक नगररचनाकाराने हजेरी लावणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. एकूणच नियोजन सभापती व सहाय्यक नगररचनाकार यांच्यातील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 4:51 am

Web Title: complaint against town planning architecture to chief officer
टॅग Town Planning
Next Stories
1 कोटींचे घर, पण पाण्यासाठी टँकर!
2 नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची डागडुजी सिडकोकडून
3 केवळ नाव पांडे म्हणून..
Just Now!
X