News Flash

हिंगोली जिल्हा परिषद अध्यक्षांची पालकमंत्र्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मागास विकास निधी वितरणास पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी स्थगिती दिल्याने जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या बाबत तक्रार केली आहे.

| January 22, 2013 12:56 pm

मागास विकास निधी वितरणास पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी स्थगिती दिल्याने जि. प. अध्यक्षा मीनाक्षी बोंढारे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या बाबत तक्रार केली आहे. निधी वितरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलाच वाद पेटल्याचे चित्र जिल्ह्य़ात निर्माण झाले आहे.
निधीवाटपाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी लक्ष न घातल्यास पालकमंत्री गायकवाड यांना घेराव घालण्याचा इशारा जि. प.चे विरोधी पक्ष नेते मुनीर पटेल, विनायक देशमुख यांनी दिला.
पालकमंत्री बैठका घेऊन विकासकामांना खिळ बसेल अशा प्रकारे हस्तक्षेप करीत आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ३१ मार्चपूर्वी विकासकामांचा निधी खर्च होणे शक्य होणार नाही. जि. प.च्या कामात त्या अकारण हस्तक्षेप करतात. त्यांना असे करण्यास परावृत्त करावे, अशी विनंतीही बोंढारे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:56 pm

Web Title: complaint of guardian minister from hingoli district parishad president to cm
Next Stories
1 स्थायी समिती सभापतिपदी काँग्रेसच्या धबालेंची निवड
2 खासगी शाळांनी २५ जानेवारीपर्यंत स्वप्रतिज्ञापत्र देण्याच्या सूचना
3 थकीत वेतनप्रश्नी प्रजासत्तादिनी मंत्रालयासमोर निदर्शने करणार
Just Now!
X