07 August 2020

News Flash

खा. ओवेसी यांच्या सभेस पोलिसांची सशर्त परवानगी

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन (एमआयएम)चे अध्यक्ष खासदार असोदोद्दीन ओवेसी यांची उद्या (शुक्रवारी) येथे जाहीर सभा होणार असून, सभेस पोलिसांनी काही अटींवर परवानगी

| November 8, 2013 01:41 am

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन (एमआयएम)चे अध्यक्ष खासदार असोदोद्दीन ओवेसी यांची उद्या (शुक्रवारी) येथे जाहीर सभा होणार असून, सभेस पोलिसांनी काही अटींवर परवानगी दिली.
ओवेसी यांची सभा सायंकाळी ६ वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतनच्या मदानावर होणार आहे. मात्र सभेमुळे कायदा व सुव्यवस्था, तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. आक्षेपार्ह घोषणा देण्यास बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक सलोखा किंवा सार्वजनिक शांतता बिघडेल, अशी कुठलीही वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत. आयोजकांनी याबाबत सभेत सहभागी होणाऱ्या वक्त्यांना योग्य ती समज द्यावी, अशी सूचना केली आहे. कोतवाली पोलिसांनी ओवेसींच्या सभेला परवानगी देताना १४ अटी घातल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2013 1:41 am

Web Title: conditional permission of police to mp owaisi rally
टॅग Mim,Mp,Owaisi,Parbhani,Rally
Next Stories
1 २६ कोटींवर निधी मंजूर, कामे प्रस्तावात अडकली!
2 दहा बडय़ा थकबाकीदारांवर फौजदारी कारवाईचा प्रस्ताव
3 जादूटोणा विरोधी कायद्यास गोरोबाकाका दिंडीचा पाठिंबा
Just Now!
X