News Flash

‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल: आत्मविश्वास वाढला

प्रेमाची भाषा जगभरात एकच असते. प्रेमाचा वसंत ऋतुसुद्धा एकच असतो. कोणी या ऋतुला ‘वसंतपंचमी’ म्हणतो कुणी ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणतो. प्रत्येक तरुण- तरुणीच्या मनातील विचार व्यक्त

| February 5, 2014 08:07 am

प्रेमाची भाषा जगभरात एकच असते. प्रेमाचा वसंत ऋतुसुद्धा एकच असतो. कोणी या ऋतुला ‘वसंतपंचमी’ म्हणतो कुणी ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणतो. प्रत्येक तरुण- तरुणीच्या मनातील विचार व्यक्त करणारी ‘नाथा कामत’ची डायरी आजच्या वसंतपंचमीपासून पुढील आठवडय़ात येणाऱ्या व्हॅलेंटाइन डेपर्यंत रोज..

‘मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे..’ काल रात्री ‘टाइमपास’ पाहिल्यापासून माझा आत्मविश्वास भलताच वाढलाय. त्यातील दगडूला जर प्राजक्ता पटू शकते. तर मग मी कुठे कमी आहे? मलाही ती नक्कीच पटू शकते. पण आज वाढलेल्या आत्मविश्वासाचा थोडा फटकाही बसला असता. थोडक्यातच बचावलो म्हणायला हरकत नाही. टाइमपासचे भूत डोक्यात होते. त्यामुळे सकाळी वेळेवर उठून बस गाठली. गर्दी चांगलीच होती. पुढचे तीन स्टॉप गेल्यावर गर्दी कमी झाली आणि ‘ती’ दृष्टिपथात आली. एकदा तिचा चेहरा पाहिला आणि दिवस एकदम झक्कास जाणार याचं समाधान चेहऱ्यावर आलं. आणखी दोन स्टॉप उरले होते आणि तिचा स्टॉप येणार होता. एव्हाना बस बऱ्यापैकी रिकामी झाली होती. मागे बसायलाही जागा होती. पण मी महिलांच्या सीटच्या इथेच रेंगाळलो होतो. इतक्यात कंडक्टरने आवाज दिला, ‘काय रे हिरो, पोरी बघतोस का? मागे जाऊन बस.’ सगळय़ांसमोर एवढी इज्जत काढल्यावर मागे जाऊन बसणं भागच पडलं. पण यात एक फायदा झाला. तिनं माझ्याकडे वळून पाहिलं. तसं तिनं एकटीनं नाही पाहिलं. सगळय़ांनीच पाहिलं. पण तिचं पाहणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. स्टॉपवर उतरल्यावर परत ती माझ्याकडे वळून पाहील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे ‘दगडू’ची स्टाइल मारत तिची काही वस्तू पडतेयं की काय याची वाट पाहात होतो. पण आपल्याबाबतीत असं कधीच होत नाही ना. काहीच पडलं नाही. उलट रोजच्यापेक्षा जरा जास्त वेगानेच ती कॉलेजच्या दिशेने गेली. असो. बघेल बघेल. एक दिवस असा येईल की ती माझ्याकडेच पाहात राहील आणि माझ्या बाबतीतच विचार करत असेल. तो दिवस आता फार दूर नाही. असं माझा आतला आवाज सांगतोय.
     नाथा कामत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 8:07 am

Web Title: confidence increase
टॅग : Valentines Day
Next Stories
1 पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प ३१ हजार कोटींचा
2 हातेकर सरांचा असाही तास!
3 सुनील बर्वे आणि सोनाली खरेची ‘बे दुणे दहा’
Just Now!
X