नरेंद्र मोदी झंजावातापुढे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातून काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे जसे पानिपत झाले तसे ते सोशल मीडियावरही झाले. शुक्रवारी फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवरही काँग्रेस पूर्णपणे ‘मोडी’त’ निघाली. सकाळी मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅपवर मोदी विजयोत्सवाचे आणि काँग्रेसला शालजोडीतील हाणणारे अनेक संदेश आणि चित्रसंदेश फिरत होते.
या निवडणुकीत सुरुवातीपासूनच सोशल मीडियावरून ‘अब की बार, मोदी सरकार’ने जसा धुमाकुळ घातला तसाच तो शरद पवार यांच्या ‘महिला धोरणा’नेही घातला होता. मतदान होण्यापूर्वी याविषयीचे विविध संदेश पूर आल्यासारखे फिरत होते.
ल्ल मतमोजणीच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी शाहरुखखान बाबतचा संदेश फिरत होता. १६ मे रोजी दुपारी दिल्ली रेल्वे स्थानकातून पाकिस्तानला जाणारी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण देश सोडून जाऊ असे विधान करणाऱ्या शाहरुख खान, लालूप्रसाद यादव, सॅम पित्रोदासहित अन्य सर्व मंडळींनी वेळेवर रेल्वे स्थानकावर पोहोचावे, असा इशारा या संदेशात दिला गेला होता. यातच पुढे म्हटले होते, पाच वर्षांवरील लहान मुलांचे पूर्ण तिकिट असेल (राहुल गांधीचे ही), खिसेकापूंपासून सावध राहा (गाडीत पी. चिदम्बरमसुद्धा असतील) आणि नवविवाहितांसाठी एस-१ मध्ये जागा असेल (दिग्गी राजा)..
ल्ल शुक्रवारी सकाळी निवडणुकीचे कल आणि निकाल जाहीर होऊ लागले तसा सोशल मीडियावर संदेशांना अक्षरश: उधाण आले. यातील एक होता मनमोहन सिंह आता आत्मचरित्र लिहिणार असून त्याचे नाव असेल ‘फाईव्ह मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ टू-जी, थ्री-जी, सोनिया-जी, राहुल-जी आणि राहुल के जीजाजी..
ल्ल तर राहुल गांधी यांच्यासाठी महत्त्वाचा निरोप होता ‘राहुल, जहाँ भी हो, घर आ जाओ. माँ परेशान है। कोई कुछ नही कहेगा। सारी जिम्मेदारी मनमोहन अंकल ने ली है। – प्रियांका..
ल्ल नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्वाची पाकिस्ताननेही धास्ती घेतली आहे, असे वाटावे, असा एक संदेश ‘ब्रेकिंग न्यूज.. पाकिस्तान डिक्लियर ऑन जिओ टीव्ही. वुई डोंट वॉन्ट काश्मीर नाऊ. बट वुई वील नॉट गिव्ह कराची’..
ल्ल लेटेस्ट न्यूज. राहूल गांधी एस्सेल वर्ल्डमध्ये सापडले असून ते ‘घर नही जाऊंगा मै’ हे गाणे गात फिरत आहेत..
ल्ल या संदेशांबरोबरच मोदी विजयोत्सवाचे तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, शरद पवार यांच्याविषयी ही व्हॉट्स अ‍ॅपवर विविध चित्रसंदेश येत होते. यात कविता, चारोळ्या आणि काही उखाणेही होते.  उखाण्यांमध्ये   
कोण हरणार, कोणजिंकणार
चर्चेला आले उधाण
शरदरावांचे नाव घेते
मोदीच होणार पंतप्रधान..