22 September 2020

News Flash

काँग्रेसचा गनिमी कावा : डॉ. गावितांविरोधात अजित पवारांच्या सभा

पक्षनेत्यांची विनंती धुडकावत मुलीसाठी मंत्रिपदावर पाणी सोडणारे आणि राष्ट्रवादीमधून हकालपट्टी ओढवून घेणारे डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजकीय भूमिकेला शह देण्यासाठी काँग्रेसने गनिमी काव्याचा आधार घेतला

| March 29, 2014 01:03 am

पक्षनेत्यांची विनंती धुडकावत मुलीसाठी मंत्रिपदावर पाणी सोडणारे आणि राष्ट्रवादीमधून हकालपट्टी ओढवून घेणारे डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजकीय भूमिकेला शह देण्यासाठी काँग्रेसने गनिमी काव्याचा आधार घेतला आहे. डॉ. गावितांचे राष्ट्रवादीतील गुरू अजित पवार यांच्या प्रचार सभांचे  माणिकराव गावित यांच्यासाठी आयोजन करून एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव आखला आहे.
राज्य मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून डॉ. विजयकुमार गावित यांना अगदी हकालपट्टी होईपर्यंत ओळखले जाई, परंतु आघाडी विरोधात लोकसभा निवडणुकीत त्यांनी कन्या डॉ. हीना यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. जिल्ह्यात काँग्रेस विरोधात नेहमीच भूमिका घेणाऱ्या डॉ. गावित यांना राजकीय बळ देणारे अजित पवार यांची विनंती अव्हेरणाऱ्या डॉ. गावित यांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसने आता अजित पवार यांनाच जाहीर सभांच्या रिंगणात उतरवण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात काँग्रेसने अजित पवार यांच्या दोन सभांचे नियोजन केले असून, या सभांना अजित पवारांनी समर्थन दर्शविले आहे. सभांची तारीख निश्चित होताच त्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2014 1:03 am

Web Title: congress guerilla tactics against dr gavit
Next Stories
1 ‘नाटो’ साठी अनिल गोटे जनजागृती करणार
2 एकनाथ खडसे-गिरीश महाजन भेटीत मतभेद संपविण्यावर भर
3 निवडणूक कर्मचाऱ्यांना भत्त्याचे बळ
Just Now!
X