25 February 2021

News Flash

महागाईविरोधात काँग्रेसचेउपोषण

महागाईप्रश्नी काँग्रेस आघाडी सरकार विरोधात सतत रान उठविणाऱ्या विरोधकांनी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केली

| June 25, 2014 08:32 am

महागाईप्रश्नी काँग्रेस आघाडी सरकार विरोधात सतत रान उठविणाऱ्या विरोधकांनी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केली. पण सत्तेवर येताच जनतेला महागाईचे चटके देणे सुरू केल्याची टीका करत मोदी सरकारच्या या धोरणाविरोधात तालुका कांग्रेस पक्षातर्फे मंगळवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ उपोषण करण्यात आले. सरकारने वेळीच महागाई न रोखल्यास पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
पक्षाचे प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, कार्याध्यक्ष सुकदेव देवरे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. भाजप व त्यांचे मित्र पक्ष काँग्रेस सत्तेत असताना महागाईप्रश्नी उठसूठ बेताल आरोप करून राजकारण करीत असत. हे करीत असतांना त्यांनी खोटी आश्वासने देऊन आणि जनतेला भुलवित सत्ता हस्तगत केली. मात्र सत्तेवर येताच मोदी सरकारने आपले असली रंग दाखविणे सुरू केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला.
मोदी सरकारने जी रेल्वे भाडेवाढ केली ती जनतेला न परवडणारी असल्याने ती तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 8:32 am

Web Title: congress hunger strike against inflation
टॅग : Nashik News
Next Stories
1 रस्त्यात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अपघातास आमंत्रण
2 ‘एलबीटी’च्या वार्षिक विवरण पत्राकडे व्यापाऱ्यांची पाठ
3 सुहास कांदेच्या नावाने खंडणीची मागणी, दोन जणांविरुद्ध गुन्हा
Just Now!
X