13 August 2020

News Flash

काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध; उद्या बैठक

काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लावण्याचे आदेश देण्यात आले होते.

| November 8, 2012 03:48 am

काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असून याचसंदर्भात काही दिवसांपूर्वी पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना कामाला लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आता प्रत्यक्ष सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघामधील पक्षाच्या बांधणीचा आढावा घेण्यासाठी पक्षनिरीक्षक के. एल. दुर्गेशप्रसाद हे येत्या ९ नोव्हेंबर रोजी सोलापुरात येत आहेत.
पक्षनिरीक्षक दुर्गेशप्रसाद यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा काँग्रेसची बैठक शुक्रवारी सकाळी दहा वाजता काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आली आहेत. या बैठकीस पक्षाचे आजी-माजी लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी, विविध आघाडय़ांचे पदाधिकारी, समन्वय समितीचे सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या हेतूने शहरात काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक अलीकडेच घेण्यात आली होती. या वेळी सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवावा आणि जनतेच्या विकासाची कामे वेगाने करावीत, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक दुर्गेशप्रसाद हे सोलापूरला येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2012 3:48 am

Web Title: congress looking forward on forthcoming elections
टॅग Congress,Solapur
Next Stories
1 कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तीनी घ्यावा – मुख्यमंत्री
2 खंडपीठ मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचा मोर्चा
3 शरद पवार दारिद्रय़रेषेखालील आहेत का? – शेट्टी
Just Now!
X