काँग्रेस पक्ष लोकसभेच्या २९ जागा लढवणार असून, राष्ट्रवादीला १९ जागा देण्याची काँग्रेस ची तयारी असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दिली. अर्थात, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपासंबंधीचा अंतिम निर्णय दिल्लीत पक्षश्रेष्ठी घेतील, अशी पुष्टीही ठाकरे यांनी जोडली.  काँग्रेसला २६ आणि राष्ट्रवादीला २२, असे जागा वाटपाचे सूत्र असल्याचे यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सुचवलेला फॉम्र्युला जोरदार चच्रेचा विषय झाला आहे.
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. या मतदारसंघातून आतापर्यंत कांॅग्रेसच लढली आहे आणि २०१४ मध्येही  कॉंग्रेसच लढणार असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे येथे त्यांच्या निवासस्थानी वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाकांक्षी अशा दारव्हा व बाभूळगाव तालुक्यातील डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना िठबक संचासाठी अधिक अनुदानाची  गरज आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. बेंबळा प्रकल्पातून नेर व बाभुळगाव तालुक्यातील अवर्षणग्रस्त १७ गावांमध्ये डेहणी उपसा सिंचन प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. यातून तब्बल २० हजार एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून येथे िठबक सिंचन पध्दती वापरण्यात येत आहे. शासन सध्या ठिबक संचावर ५० ते ७५ टक्के अनुदान देत आहे.
डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचे अनुदान ९० टक्क्यांपर्यंत  वाढवून द्यावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. हा प्रकल्प पूर्णत वेगळा असून, त्यासाठी नियमित योजनांच्या निकषात बदल करणे आवश्यक आहे. विदर्भ  सिंचन विकास महामंडळाने हे अनुदान द्यावे, असा प्रस्ताव ठेवला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ८ नोव्हेंबरला डेहणी प्रकल्पाला भेट देणार असल्याचे सांगून ते म्हणाले, याच दिवशी यवतमाळातील तहसील चौक ते गोधणी मार्गाला दिवं. आमदार नीलेश पारवेकर यांचे नाव देण्यात येणार असून नामफलकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.