सरकारने सिंचनासंदर्भात जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेत विदर्भातील २५ टक्के काम झालेले प्रकल्प बंद करण्याची शिफारस करण्यात आली असून या शिफारशीबाबत सहमत नसल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
सरकारने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेवर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, विदर्भातील २५ टक्के प्रकल्प सुरू असताना ते बंद करण्याची शिफारस श्वेतपत्रिकेत करण्यात आली असून त्या मताशी सहनत नाही. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प अपूर्ण असताना ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सिंचनाच्या प्रश्नांवर विरोधकांकडून पक्षांकडून गोंधळ घातला असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करून समन्वयाने विरोधकांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. अशाच पद्धतीने सभागृह सुरू राहिले तर विदर्भाचे प्रश्न सुटणार नाहीत.  मराठवाडय़ातील पाण्याच्या प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहे त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविण्याची गरज आहे. राज्यात पाण्याच्या प्रश्नावर क्षेत्रीय वाद नको असेही अशोक चव्हाण म्हणाले