गेल्या अडीच महिन्यापासून बेरोजगारीत व आíथक अडचणीत जीवन जगत असलेल्या कंत्राटी विषयतज्ज्ञांना पुनíनयुक्ती आदेश मिळावे म्हणून कंत्राटी विषयतज्ज्ञ वशिष्ठ खोब्रागडे यांनी जिल्हा परिषदेसमोर आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. त्यासंबंधी रीतसर पोलीस विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिले होते. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी यश मिळून सर्व कंत्राटी विषयतज्ज्ञांना नियुक्ती आदेश जिल्हा परिषदेकडून जारी करण्यात आल्याने त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
बजेटअभावी सर्व विषयतज्ज्ञांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले होते. परंतु, संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून राज्यातील २ हजार १०५ विषयतज्ज्ञांचे बजेट मंजूर करण्यात आले. परंतु, काही अडचणींमुळे जिल्हा प्रशासन पुनíनयुक्ती आदेश देण्यास विलंब करीत होते. अखेर बेमुदत उपोषणाचा पवित्रा एका विषयतज्ज्ञाला घ्यावा लागला. बहुतांशी विषयतज्ज्ञांचा  उपोषणाला पािठबा मिळाला. ज्यांचे समायोजन नांदेड जिल्ह्यात झाले ते काही १० टक्के असंतुष्ट विषयतज्ज्ञांना सोडले, तर सर्वाना सर्वप्रथम नोकरी आवश्यक असल्याने नियुक्ती आदेश तात्काळ मिळावे यासाठी उपोषणात सहभागी झाले होते. पुनíनयुक्ती आदेश मिळाल्याने ते सर्व नांदेड येथे रुजू होण्यास रवानादेखील झाले. ज्यांना नोकरीची गरज नाही व जे घरचे सधन आहेत, ते विषयतज्ज्ञ समायोजनावर आक्षेप घेऊन जिल्हा प्रशासनावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बेमुदत दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करून उपोषणकर्ता वशिष्ठ खोब्रागडे यांचे आदेश सोपविले व उपोषण सोडण्याची सूचना केली. त्यामुळे विषयतज्ज्ञ   संघटनेचे    जिल्हाध्यक्ष    अनिता ठेंगडी व इतर  पदाधिकाऱ्यांनी वशिष्ठ खोब्रागडे यांना पुनíनयुक्ती आदेश देत लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले.
सर्व विषयतज्ज्ञांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांचे आभार मानले.