उर्दू आणि हिंदी साहित्य, नाटक लघुकथा लेखनामुळे गाजलेले लेखक सादत हसन मंटो यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त हिंदुस्थानी प्रचार सभा या संस्थेतर्फे मंटो यांचे विचार, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे साहित्य या विषयावर शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी दिवसभराच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी प्रचार सभा, ७, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, चर्नी रोड रेल्वेस्थानकाजवळ, चर्नी रोड येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. मंटोप्रेमी उर्दू, मराठी, हिंदी साहित्यिक, मंटोप्रेमी वाचक तसेच  चित्रपट व नाटय़ क्षेत्रातील कलावंतही या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत.
मंटोंनी लिहिलेल्या पत्रांचे वाचन, पुस्तक प्रकाशन, कथावाचन, पुस्तक प्रदर्शन आणि चित्रपटाचा विशेष खेळ अशा भरगच्च कार्यक्रमांद्वारे मंटो यांच्या विविधांगी व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी अस्लम परवेझ यांच्याशी ७७३८९४००४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.