News Flash

चाळीसगावमध्ये लवकरच मका प्रक्रिया उद्योग

चाळीसगाव बाजार समितीत मका मोठय़ा प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्यामुळे मका प्रक्रिया प्रकल्पासाठी या समितीला प्राधान्य देण्यात येईल

| January 11, 2014 02:44 am

चाळीसगाव बाजार समितीत मका मोठय़ा प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्यामुळे मका प्रक्रिया प्रकल्पासाठी या समितीला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन जळगावचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी दिले. पतसंस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांना मुलींच्या लग्नासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याशिवाय तालुक्यातील शहीद जवान गणेश अहिरराव आणि शशिकांत पवार यांच्या कुटुंबीयांपैकी एकास लवकरच नोकरी देण्यात येईल, अशी ग्वाहीही सावकारे यांनी दिली.
येथील बाजार समितीतर्फे अनिलदादा देशमुख स्मृतिनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सहकार व पणन राज्यमंत्री सुरेश धस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आ. राजीव देशमुख यांनी  वरखेडे धरण, पांझण धरणापासून थेट चाळीसगावपर्यंतचा नळ पाणीपुरवठा आदी कामांचा आढावा घेतला. बंद पडलेला बेलगंगा साखर कारखाना सुरू करण्यासाठी धस व सावकारे यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 2:44 am

Web Title: corn process industry in chalisgaon soon
Next Stories
1 चर्चेतील प्रतिसादाचे ‘राज’
2 नाशिकवर धुक्याची दुलई
3 वाहतुकीची कोंडी करणाऱ्या वाहनधारकांच्या अशा या तऱ्हा
Just Now!
X