महापालिकेच्या नूतनीकरण झालेल्या रक्तपेढीचे आज मनपाचे प्रभारी आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे व विरोधी पक्षनेते विनित पाऊलबुद्धे अशा तिघांनी रक्तदान करून महापौर शीला शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन केले.
उपमहापौर गीतांजली काळे, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, महिला बाल कल्याण समिती सभापती किरण उनवणे, उपसभापती मालनताई ढोणे, शिक्षण समितीचे सभापती सतीश धाडगे, नगरसेवक संभाजी कदम, संजय चोपडा, बाळासाहेब बोराटे आदी सत्तेतील अनेक नगरसेवक यावेळी उपस्थित होते, मात्र त्यांच्यापैकी कोणी रक्तदान केले नाही.
महापौर श्रीमती शिंदे यांनी सांगितले की गरीब रुग्णांसाठी संजीवनी असलेली ही रक्तपेढी नव्या स्वरूपात सुरू करता आली ही आनंदाची बाब आहे. पूर्वीपेक्षा अधिक सुसज्ज अशा या रक्तपेढीचा आता रुग्णांना अधिक लाभ होईल असे त्यांनी सांगितले. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय अधिकारी वृषाली पाटील, उद्यान अधीक्षक के. ए. गोयल यांनीही रक्तदान केले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते उबेद शेख, गोपीनाथ मिसाळ, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. रुपाली कुलकर्णी, प्रसिद्धी अधिकारी सुनिता पारगावकर, अभियंता व्ही. जी, सोनटक्के, निंबाळकर,  प्रभाग अधिकारी साबळे, रणदिवे, बाबू चोरडिया, बाबा मुदगल, नंदू डहाणे अनिल लचके, कळेकर आदी उपस्थित होते.