News Flash

अडीच कोटी खर्चून पालिकेने २० कोटी कमावले

जागांच्या वाढत्या किमतीत सर्वच जण आपले उखळ पांढरे करून घेत आहेत.

| February 14, 2014 06:42 am

जागांच्या वाढत्या किमतीत सर्वच जण आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. पनवेल पालिकाही त्यास अपवाद नसून एका मोकळ्या भूखंडावर अडीच कोटी रुपये खर्चून तब्बल २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. शहरातील शिवाजी चौकालगत नवीन व्यापारी संकुल उभारून पालिकेने ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ाच्या स्वरूपात मालकीहक्क देत आपला मोबदला कमावला आहे.
या दुमजली शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ५७ गाळे आहेत. यामुळे पालिकेचे रखडलेले प्रकल्प होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी दिली.
पनवेल पालिका यापुढील चार वर्षांत आपल्या कक्षा रुंदावत पारदर्शक कारभार करून पनवेलकरांना हक्काचे शुद्ध व मुबलक पाणी, निरोगी जीवन, काँक्रीटचे चकाचक रस्ते, एलईडी पथदिवे, नाटय़गृह, शहरात फिरणाऱ्या मिनी- मिडीबस आदी सुविधा देऊन झोपडपट्टीमुक्त शहर असा पनवेलचा लौकिक घडवेल, असा दावाही मुख्याधिकाऱ्यांनी केला आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 6:42 am

Web Title: corporation lost 20 crore rupees
टॅग : Corporation,Panvel
Next Stories
1 वाशीतील नाकाबंदीमुळे नवी मुंबई शांत, शांत..
2 पनवेलमध्ये मनसेच्या सक्रिय कार्यकर्त्यांना अटक केल्याने रास्ता रोको बारगळला
3 जेएनपीटी परिसरावर अंशत: परिणाम
Just Now!
X