News Flash

भ्रष्ट सरकार सत्तेवरून खाली खेचा- कराड

काँग्रेस आघाडीच्या जातीय व भ्रष्ट सरकारने देश भ्रष्टाचाराने पोखरून टाकला. या सरकारला येत्या निवडणुकीत गाडून टाकण्याचे आवाहन भाजप नेते रमेशअप्पा कराड यांनी केले.

| November 15, 2013 01:48 am

काँग्रेस आघाडीच्या जातीय व भ्रष्ट सरकारने देश भ्रष्टाचाराने पोखरून टाकला. या सरकारला येत्या निवडणुकीत गाडून टाकण्याचे आवाहन भाजप नेते रमेशअप्पा कराड यांनी केले.
भाजपतर्फे मोटेगाव येथे पोहरेगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात कराड बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत पवार होते. टी. पी. कांबळे, दिलीपराव देशमुख, हणमंत नागटिळक, ललिता कांबळे, श्रीकिशन जाधव, नवनाथ भोसले यांची उपस्थिती होती. राजकारण ही समाजकारणाची गुरुकिल्ली आहे. मी स्वच्छ राजकारण करणार आहे. गाव, वाडी, तांडय़ावर जाऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावा, असे कराड यांनी सांगितले. काँग्रेस कार्यकत्रे युवराज कसबे, रामदेव कसबे, करण कसबे, महादेव कसबे, ज्ञानदेव कसबे, बाबू कसबे यांच्यासह अनेकांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:48 am

Web Title: corrupt government down under power karad
टॅग : Bjp,Government,Latur,Power
Next Stories
1 झेरॉक्स सेंटरवर छाप्यात तीन लाखांचा ऐवज जप्त
2 काँग्रेस नेते विलास खरात समाजवादी पार्टीत दाखल
3 समाधान योजनेमध्ये जनतेचा सहभाग वाढवा – जयस्वाल
Just Now!
X