News Flash

लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायास अटक

१ लाख ८० हजार रुपये लाचेच्या रकमेतील उर्वरित ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पोलीस शिपाई शैलेश गोविंद वाळके (वय ३१) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

| January 15, 2013 08:40 am

१ लाख ८० हजार रुपये लाचेच्या रकमेतील उर्वरित ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पोलीस शिपाई शैलेश गोविंद वाळके (वय ३१) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले.
शैलेश वाळके हा राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये सेवेत होता. सध्या तो बुधवार पेठेतील पोलीस उपअधीक्षक कार्यालयामध्ये प्रतिनियुक्तीवर आहे. १४ डिसेंबर २०१२ रोजी वाळके याने खासगी बस ट्रॅव्हल्स एजन्सी चालक खलिल अजिज खान (वय २३ रा.ई वॉर्ड) याच्या बसमध्ये ३५ लिटर रॉकेलच्या कॅनसह पकडले. खाजगी बसमध्ये रॉकेलची भेसळ करून प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा उल्लंघन केल्याच्या कारणावरून कारवाई करण्याची भीती घातली. त्यासाठी खान याला वाळके याने पोलीस उपअधीक्षक कार्यालयापर्यंत आणले. तेथे गुन्हा दाखल करायचा नसेल तर ५ लाख रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगितले. दोघांमध्ये तडजोडीचे संभाषण झाले. त्यानुसार खान याने वाळके यास १ लाख ७५ हजार रुपये दिले.
पावणे दोन लाख रुपयांची रक्कम मिळवूनही वाळके समाधानी नव्हता. उर्वरित लाचेची पाच हजार रुपयांची रक्कम मिळावी, यासाठी वाळके हा खान याच्याशी मोबाइलवरून सतत संपर्क साधत होता. अखेर वाळके याच्या पैशाच्या मागणीला कंटाळून खानने आज लाचेची रक्कम देण्याचे ठरविले. त्यावर खाने याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून या संदर्भातील माहिती व मोबाइलवर रेकॉर्ड केलेले संभाषण ऐकविले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. बुधवारी दुपारी खानविलकर पेट्रोल पंपाजवळ वाळके आल्यानंतर खान याने लाचेची रक्कम दिली. ही रक्कम स्वीकारत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 8:40 am

Web Title: corrupt police arrested in kolhapur
Next Stories
1 कराड क्लबच्या क्रिकेट स्पर्धेत शिवाजी विद्यालय विजयी
2 महावितरण कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
3 वाण म्हणून कापडी पिशव्या भेट देण्याचा उपक्रम
Just Now!
X