दीपावली सणामुळे उद्यापासून (मंगळवार) ३ दिवस परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील कापूस खरेदी बंद राहणार आहे.   ७ नोव्हेंबरपासून जाहीर लिलावाद्वारे व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली होती. पहिल्याच दिवशी दोन हजार क्विंटल कापूस खरेदी झाला. त्यावेळी ४ हजार २३१ रुपये क्विंटल भाव कापसाला मिळाला. सोमवारी कापसाच्या भावात २०० रुपयांची घसरण झाली.
सोमवारी ४ हजार ५ रुपये क्विंटल दराने व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी केली.
 सीसीआय अद्याप कापूस खरेदी स्पर्धेत उतरली नसल्याने भाव चार हजारांच्या आसपास स्थिर आहे. मंगळवारपासून दिवाळीची धामधूम सुरू होत आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस कापूस खरेदी बंद राहणार आहे.
शुक्रवारपासून (दि. १६) पूर्ववत जाहीर लिलावाद्वारे कापूस खरेदी सुरू होणार आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती आमदार संजय जाधव, उपसभापती आनंद भरोसे, सचिव सुरेश तळणीकर यांनी केले आहे.