सेंट्रल बँक ऑफ इंडिया व ‘लोकसत्ता यशस्वी भव’ योजनेंतर्गत डोंबिवलीतील सरलाबाई म्हात्रे विद्यालयातील १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सेंट्रल बँकेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार खडके व ठाणे विभागीय व्यवस्थापक सुनील चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्य़ातील विविध मराठी शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता यशस्वी भव योजनेतून मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात अले.
डोंबिवली येथील सरलाबाई म्हात्रे शाळेतील विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान व सामान्य गणितासंबंधी अतिशय सोप्या पद्धतीने सुप्रिया अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील दहावी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांची आवर्जून उपस्थित होती. सेंट्रल बँकेने ठाणे जिल्ह्य़ासह कोकण पट्टय़ातील काही निवडक शाळांच्या विद्यार्थ्यांना दहावी मार्गदर्शन मिळावे, या हेतूने ‘लोकसत्ता यशस्वी भव’ मार्गदर्शन मालिका सुरू केली आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.